‘रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्या’
By admin | Published: November 16, 2016 04:59 AM2016-11-16T04:59:15+5:302016-11-16T04:59:15+5:30
राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी विधि महाविद्यालयांमध्ये राखीव जागा रिक्त असल्यास त्या जागांवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्या
मुंबई : राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी विधि महाविद्यालयांमध्ये राखीव जागा रिक्त असल्यास त्या जागांवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अशा सूचना सीईटी सेलने विधि महाविद्यालयांना दिल्या आहेत.
राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी विधि महाविद्यालयांमध्ये १५ टक्के जागा राखीव असतात. या जागा भरल्या नाहीत तरीही दुसऱ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश दिला जात नाही. पण यंदा विधि प्रवेशाचा गोंधळ पाहता पाच गुणवत्ता याद्या जाहीर होऊनही या जागा रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. शिवाय खुल्या प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण असूनही प्रवेशापासून वंचित राहावे लागते. यामुळे अनेक महाविद्यालयांनी या जागा इतर प्रवर्गातून भरण्याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)