Join us

शिक्षक -शिक्षकेतरांना तातडीने रेल्वे प्रवासाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १० वी आणि १२ वीच्या निकालाच्या कामकाजासाठी तसेच उद्या १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १० वी आणि १२ वीच्या निकालाच्या कामकाजासाठी तसेच उद्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर शालेय कामकाजासाठी उपस्थितीत राहणे आवश्यक आहे.

त्यामुळे १० वी आणि १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी व नवीन वर्षाच्या कामकाजासाठी शिक्षक-शिक्षकेतरांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेची परवानगी तातडीने परवानगी द्यावी. तसेच शिक्षक-शिक्षकेतरांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून तातडीने लसीकरण कारावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व अध्यक्ष अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांनी सदर मागणी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेल व पत्राद्वारे केली आहे. त्याला मुख्यमंत्री कार्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण विभाग व मदत आणि पुनर्वसन विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती शिवाजी शेंडगे व मुंबई उपाध्यक्ष राज बोराटे यांनी दिली.

------------------------------------- -