नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंत परवानगी द्या; प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By मनोहर कुंभेजकर | Published: September 12, 2022 04:34 PM2022-09-12T16:34:57+5:302022-09-12T16:35:10+5:30

गुजरात,राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते.

Allow till 12 noon to play garba for nine days during Navratri festival; MLA Prakash Surve's letter to Chief Minister Eknath Shinde | नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंत परवानगी द्या; प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंत परवानगी द्या; प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext

मुंबई- कोरोनाचे संकट दूर होऊन यंदा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा केला गेला. आता  मुंबई सह राज्यात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 

यंदा सोमवार दि,२६ सप्टेंबर ते मंगळवार दि,४ ऑक्टोबर पर्यंत या नऊ दिवस मुंबई सह राज्यात  ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडीयाचे  जल्लोषात आयोजन केले जाणार आहे. सर्व जाती धर्माचे नागरिक कायद्याचे पालन करत नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करतात.

गुजरात,राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते. त्याप्रमाणे नागरिकांना हा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी व गरबा खेळण्यासाठी या नऊ दिवसांत १२ वाजेपर्यंत मुंबईसह राज्यात परवानगी द्यावी अशी विनंती मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे आमदार व विभाग क्रमांक १ चे विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी आज एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. आपल्या विनंतीला मान देऊन आपण सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय द्यावा  अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Web Title: Allow till 12 noon to play garba for nine days during Navratri festival; MLA Prakash Surve's letter to Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.