लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिकेच्या १७ शाळांमध्ये शिकणाऱ्या ८२३ विशेष विद्यार्थ्यांना मासिक एक हजार रुपयांचा भत्ता मिळणार आहे. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा भत्ता सुरू होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती जाहीर केल्या आहेत. त्या आधारावर पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासाचा खर्च सुटावा यासाठी मासिक एक हजार रुपयांचा भत्ता द्यावा, असे पत्र शिक्षण समिती सदस्य विश्वनाथ दराडे यांनी शिक्षण समितीला दिले होते. यावर प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे.पालिका शाळेतील विद्यार्थिनींना दैनंदिन एक रुपया भत्ता तसेच सर्व विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात. आता विशेष विद्यार्थ्यांना भत्ता दिल्यास त्यांच्या प्रवासाचा खर्च वाचणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पालिकेच्या विशेष विद्यार्थ्यांना एक हजार रुपये भत्ता
By admin | Published: May 30, 2017 6:51 AM