Join us

आलोक कंसल यांनी स्वीकारला मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांना रेल्वे बोर्डाच्या पायाभूत सुविधा सदस्य म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

आलोक कंसल हे भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेच्या १९८३ च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी असून, १४ जानेवारी २०२० पासून पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. आलोक कंसल यांनी रुडकी विद्यापीठातून सुवर्णपदकासह सिव्हिल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी त्याच संस्थेतून सुवर्णपदकासह स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे. त्यांना अतिवेगवान आणि आत्यंतिक घनता असलेल्या वाहतुकीच्या मार्गांच्या परिचलन आणि देखभालीचा त्यांना १८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. कंसल हे भारतीय रेल्वेची अति-वेगवान अशी पहिली शताब्दी एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असलेले पहिले सहायक अभियांत्रिकी अधिकारी आहेत.

कंसल यांनी भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेमधील ३६ वर्षांच्या अनुभवातून संरचित आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. कंसल यांनी ‘ए-झेड फॉर क्वालिटी कंट्रोल ॲण्ड इन्स्पेक्शन ऑफ काँक्रीट स्लीपर्स’ आणि ‘लर्निंग द फर्स्ट स्टेप बाय ए रेल्वे इंजिनिअर’ ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत, जी भारतीय रेल्वेच्या सर्व क्षेत्रातील सहायक विभागीय अभियंत्यांसाठी प्रात्यक्षिक मार्गदर्शक आहेत.

............................