मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात गारवा वाढल्याने खोकला आणि सर्दीचे रुग्ण वाढले आहेत. सर्वसाधारणपणे दरवर्षी डिसेंबर महिन्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असतात. दोन-चार दिवस याची लक्षणे राहतात.
वैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागात सध्या निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण हे खोकला आणि सर्दी तापाचे असल्याचे दिसून येत आहे.
या आजाराची मुंबईत मोठ्या प्रमाणात साथ आहे.
सततच्या सर्दी आणि खोकल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
घरगुती उपाय काय कराल ?
सर्वसाधारणपणे सर्दी - खोकला झाला असेल तर अनेक घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे, हळदीचे दूध प्यायल्याने अनेकदा आराम मिळतो.