लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरातील लहान मुले तापाने बेजार झाली आहेत. अनेकांना व्हायरल संसर्ग होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना आणि स्वाइन फ्लू यासारख्या साथीच्या आजारांनी पालक त्रस्त असतानाच लहान मुलांमध्ये ताप येण्याबरोबरच तळपाय, हात आणि घसा या ठिकाणी पुरळ उठण्याचे प्रकार वाढीस लागल्याने पालकांची झोप उडाली आहे.
पावसाळ्यात लहान मुलांमध्ये व्हायरल तापाचे प्रमाण वाढते. मात्र, यंदा काही मुलांच्या अंगावर लालसर पुरळ आढळण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बालरोग तज्ज्ञांच्या मते या आजाराला ‘हँड-फूट-माऊथ डिसीज’ असे म्हणतात. या आजारात तापाबरोबरच मुलांच्या तोंडात पुरळ उठते. त्यामुळे जेवण जात नाही. अंगावर पुळ्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
आजार अल्पावधीत बरा लहान मुलांच्या तापाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तर काहींना मुलांना ‘हँड-फूट-माऊथ’ या आजाराचा संसर्ग झाला आहे. या अशा प्रकारच्या रोज काही प्रमाणात केसेस आमच्याकडे येत आहेत. अनेक जणांना टेलिफोनवरून सल्ला दिला जात आहे. ४-५ दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो.- डॉ. राजू खूबचंदानी, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ
घटनांची नोंद नाही सध्या तरी आमच्याकडे अशा घटना घडल्याची नोंद झालेली नाही. मात्र, अशा काही घटना घडत असतील तर त्याची तत्काळ नोंद घेऊन पुढची कार्यवाही करण्यात येईल. - डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिकातर मुलांना शाळेत पाठवू नकाहा एक संसर्गजन्य आजार असून तो काही प्रमाणात पसरत असून शाळांनी काळजी घ्यावी. पालकांना या आजाराची शक्यता दिसली तर त्यांनी मुलांना शाळेत पाठवू नये. हा आजार काही दिवसात बरा होतो, त्यामुळे चिंतेचे कारण नाही. गेल्या ८-१० दिवसांपासून या आजाराच्या घटना दिसत असून रोजच्या प्रॅक्टिसमध्ये ७-८ टक्के रुग्ण या आजाराचे आहेत.- डॉ. विजय येवले, बालरोग तज्ज्ञ आणि राज्य कोरोना कृती दलाचे सदस्य
तर मुलांना शाळेत पाठवू नकाहा एक संसर्गजन्य आजार असून तो काही प्रमाणात पसरत असून शाळांनी काळजी घ्यावी. पालकांना या आजाराची शक्यता दिसली तर त्यांनी मुलांना शाळेत पाठवू नये. हा आजार काही दिवसात बरा होतो, त्यामुळे चिंतेचे कारण नाही. गेल्या ८-१० दिवसांपासून या आजाराच्या घटना दिसत असून रोजच्या प्रॅक्टिसमध्ये ७-८ टक्के रुग्ण या आजाराचे आहेत.- डॉ. विजय येवले, बालरोग तज्ज्ञ आणि राज्य कोरोना कृती दलाचे सदस्य
डॉक्टरांचा सल्ला घ्या लहान मुलांमध्ये तापाचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठ-दहा दिवसांत प्रतिदिन ३-४ मुले ‘हँड-फूट-माऊथ’च्या आजाराने हैराण झाली आहेत. आमच्यामध्ये याबाबत चर्चा सुरू आहेत. अनेक शाळांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. ४-५ दिवसात हा आजार बरा होत असला तरी तो एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला होत असल्याचे दिसत आहे. या आजारात मुलांच्या घशामध्ये लालसर पुरळ आल्यामुळे अनेक लहान मुले जेवण करत नाहीत. अशा वेळी पालकांनी तुपाची खिचडी, केळी घालून तयार केलेला शिरा असे मऊ पदार्थ खाण्यास द्यावेत. तसेच शरीरावर ज्या भागावर पुळ्या आहेत तेथे डॉक्टरी सल्ल्याने लोशन लावावे. - डॉ. सुहास प्रभू, बालरोग तज्ज्ञ आणि राज्य कृती दलाच्या माजी अध्यक्ष