Join us  

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या टप्प्यात एसटी कर्मचाऱ्यांचाही समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:25 AM

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात ...

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात एसटी कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक लस पहिल्या टप्प्यात आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे, पण त्यांना घर ते रुग्णालय पोहोचविण्याचे काम एसटीच्या चालक आणि वाहकांनी केले आहे. २३ मार्चपासून एसटीची अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुरू आहे. कोरोनाचा जास्त फटका आम्हाला बसला आहे. तीन हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १०० जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील सव्वा लाखात पालिकेने एसटी आणि बेस्टचा समावेश केला नाही. राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एसटी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा.