मुंबई - सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी सुसान वॉकर यांच्या पोलीस, सीबीआय, ईडी चौकशीची मागणी माजी मंत्री, आमदार आशिष शेलार यांनी केली. परदेशी नागरिक असलेल्या वॉकर या मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर म्हणून काम करतात. त्यांनी भारतातील कोणत्या वैद्यकीय संस्थेकडून व्यवसायासाठी परवानगी घेतली, याचा खुलासा व्हायला हवा. शिवाय, ज्या ठिकाणांहून, घरातून त्या थेरपी देतात त्यासाठी मुंबई पालिका आणि पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते
मात्र, त्यांनी परवानगी घेतलेली दिसत नाही. तरीही त्या कोट्यवधी रुपये कमावत आहेत. सुशांतसिंह दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वावर उपचार घेत असल्याचे वॉकर यांनी अलीकडेच मीडियाकडे उघड केले. अशा प्रकारे रुग्णांची माहिती उघड करणे कायद्याचे उल्लंघन आहे. बॉलीवूडमधील बड्या मंडळींच्या जोरावर त्या असे विधान करत आहेत का, याची चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले.