खात्यातून पूजेसाठीही पैसे काढले; मात्र पूजा झालीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:51 AM2020-08-03T05:51:03+5:302020-08-03T05:51:45+5:30
सुशांत आत्महत्याप्रकरणी पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे पाटणा पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करणार असून त्यासाठीच बिहारहून मुंबईला आले आहेत
मुंबई : सुशांतच्या बँक खात्यातून गेल्या वर्षी ३० दिवसांत पूजेसाठी सुमारे ३ लाख रुपये काढण्यात आले. मात्र पूजा झालीच नसल्याचे पाटणा पोलिसांच्या तपासात समोर आले.
असे काढले पैसे
च्१४ जुलै - ४५ हजार
च्२२ जुलै - ९१ हजार
च्२ आॅगस्ट - ८६ हजार
च्११ आॅगस्ट -
११ हजार
च्१५ आॅगस्ट -
६० हजार
‘त्या’ सिमकार्ड्सची चौकशी
सुशांतने आत्महत्येच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी बरेच सिमकार्ड बदलले. मात्र ते त्याच्या नावावर नव्हते. त्यातील एक सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीच्या, तर दुसरा सॅम्युअल मिरांडाच्या नावे आहे. मिरांडा त्यांच्या घरातील सर्व कामकाज पाहायचे. सुशांतचे सर्व कॉल रेकॉर्ड ट्रॅक करत असून सिमकार्ड्सची माहिती घेण्यात येत असल्याचे पाटणा पोलिसांनी सांगितले.
पाटणाचे पोलीस अधीक्षक मुंबईत
सुशांत आत्महत्याप्रकरणी पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे पाटणा पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करणार असून त्यासाठीच बिहारहून मुंबईला आले आहेत. दरम्यान, सुशांतला न्याय देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, त्यामुळे सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांड्ये यांनी सांगितले.