बाधित ३१ सदनिकाधारकांना मिळणार पर्यायी घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 02:26 AM2019-06-15T02:26:18+5:302019-06-15T02:26:41+5:30
मुंबई : मागा ठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग २७ सरस्वती चाळ, नरसीपाडा, कांदिवली (पूर्व) येथील ३१ घरे पोयसर नदीच्या रुंदीकरणामुळे ...
मुंबई : मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग २७ सरस्वती चाळ, नरसीपाडा, कांदिवली (पूर्व) येथील ३१ घरे पोयसर नदीच्या रुंदीकरणामुळे बाधित होणार होती. सदर ३१ सदनिकाधारकांना महानगरपालिकेतर्फे नोटीस बजावून त्यांची घरे तोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
या प्रकरणी मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी नुकतीच म.न.पा. अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांच्याशी बैठक आयोजित करून सदर आदेश शिथिल करून नागरिकांना न्याय दिला. तसेच त्वरित अंमलबजावणी करीत आज म.न.पा. अधिकारी मोजणी करण्यासाठी उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक योगेश भोईर, शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, सचिन केळकर, कल्लू बर्मे आणि सर्व नागरिक उपस्थित होते. या प्रकरणी पर्यावरण मंत्री रामदास कदम व माजी नगरसेवक योगेश भोईर यांनीही सहकार्य केले. मंत्र्यांच्या दालनात व अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनात अनेक वेळा आमदार सुर्वे यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या होत्या. सर्वांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून येथील नागरिकांना अखेर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.