मान्सून वेशीवर आला तरी कामे संपेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 01:54 AM2020-06-10T01:54:09+5:302020-06-10T01:54:41+5:30

यंदाही मिठीसह छोटेमोठे नाले तुंबण्याची शक्यता : निसर्ग वादळाचा फटका बसूनही प्रशासन ढिम्म

Although the monsoon came to a halt, the work did not end | मान्सून वेशीवर आला तरी कामे संपेनात

मान्सून वेशीवर आला तरी कामे संपेनात

Next

मुंबई : निसर्ग चक्रीवादळानंतर मान्सून वेगाने पुढे सरकत असून, येत्या काही तासांत आसपास मान्सून महाराष्ट्रासह मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील पावसाळापूर्व, पावसाळी कामांचा मात्र बोजवारा उडाला आहे. अद्यापही मुंबई शहर आणि उपनगरातील मिठी नदीसह छोटे आणि मोठे नाले पुरेसे साफ झालेले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे निसर्ग चक्रीवादळ घेऊन आलेल्या पावसादरम्यान येथील साफसफाईचा मुंबईकरांना वाईट प्रत्यय आला असून, येत्या काही दिवसांत मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही मिठीसह छोटे आणि मोठे नाले तुंबण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, सुमारे ७० टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी, तर पावसाळ्या दरम्यान व त्यानंतर उर्वरित ३० टक्के गाळाचा उपसा केला जाणार आहे, असा दावा महापालिकेने केला असून, हा दावा कितपत खरा ठरेल; हे  येत्या काही दिवसांत दाखल होणाऱ्या पावसाळ्यातच समोर येईल. मुंबई शहर आणि उपनगरातील पावसाळापूर्व कामांनी आता वेग घेतला आहे, असा दावा महापालिकेने केला आहे. मिठी नदीतील साफसफाईसह मोठ्या व छोट्या नाल्यांची पावसाळापूर्व नालेसफाई वेगात सुरू झाली आहे.
दरवर्षीप्रमाणेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईची बहुतांश कामे सुरू झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या नालेसफाईचे वेगळेपण म्हणता येईल, ते म्हणजे कोरोना कोविड १९च्या पार्र्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ही कामे करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिक पद्धतीने नालेसफाई करण्यास प्राधान्य दिले जात असून त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी असेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे, असे महापालिका म्हणत आहे  
लोकप्रतिनिधी म्हणून कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले की, येथील सर्व नाले, मिठी नदीमधील झालेल्या कामांची पाहणी नुकतीच करण्यात आली. नाल्याची सफाई झाल्यानंतर वाहत्या कचºयाचीही सफाई करावी, असे महापालिकेला सांगितले आहे, अशी माहिती कुडाळकर यांनी दिली. मिठी नदीच्या उपशाचे काम झाले आहे. वाहता कचरा लवकर साफ करण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनीदेखील काही दिवसांपूर्वी कुर्ला येथील क्रांतीनगर वस्तीलगतहून वाहत असलेल्या मिठी नदीच्या साफसफाईचे काम घेतले होते.  

च्सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्यात आला असून मुखावरणेही (मास्क) नियमितपणे वापरण्यात येत आहेत.

च्मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाईची कामे ही प्रामुख्याने महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत केली जात आहेत. छोटया नाल्यांच्या साफसफाईच्या कामांचे नियोजन व व्यवस्थापन पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर करण्यात येत आहे.

च्मुंबई शहर आणि उपनगरातील २६४ किलोमीटर लांबीच्या २८० मोठया नाल्यांची साफसफाई केली जात आहे.
च्१. शहर : २२ किलोमीटर लांबीचे २७ मोठे नाले
च्२. पूर्व उपनगर : १०२ किलोमीटर लांबीचे १११ मोठे नाले
च्३. पश्चिम उपनगर : १४० किलोमीटर लांबीचे १४२ मोठे
नाले.

च्मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यातून ३ लाख ६२ हजार ६३८ मेट्रीक टन गाळ उपसला जाईल.
च्१. शहर : ३६ हजार ४२७ टन
च्२. पूर्व उपनगर : १ लाख २२ हजार ७७० टन
च्३. पश्चिम उपनगर :
२ लाख ३ हजार ४४१ टन

च्मिठी नदी २१.५०५ किलोमीटर असलेल्या साफसफाईचे काम सुरू झाले आहे. १ लाख ३८ हजार ८३० मेट्रिक टन एवढा गाळ उपसला जाणार असून यापैकी ७० टक्के गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई दरम्यान काढला जाणार आहे.

च्१. शहर भागातील ६.२५५ किलोमीटर लांबीच्या मिठी नदीमधून सुमारे ५९ हजार ५८० टन गाळ.


च्२. पूर्व उपनगरातून १३.०३ किलोमीटर लांबीच्या मिठी नदीमधून ५४ हजार २५० टन. ३. पश्चिम उपनगरातून २.२२ किलोमीटर लांबीच्या नदीमधून सुमारे २४ हजार टन.

Web Title: Although the monsoon came to a halt, the work did not end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.