अमन लॉज-माथेरान शटल सेवा वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:10+5:302020-12-13T04:24:10+5:30

३६ दिवसांत साडेचाैदा लाखांचे उत्पन्न : पुनश्च हरिओमनंतर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेना संसर्गाची भीती ...

Aman Lodge-Matheran shuttle service speeding | अमन लॉज-माथेरान शटल सेवा वेगात

अमन लॉज-माथेरान शटल सेवा वेगात

Next

३६ दिवसांत साडेचाैदा लाखांचे उत्पन्न : पुनश्च हरिओमनंतर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेना संसर्गाची भीती असतानाही अमन लॉज-माथेरान विभागातील १२ शटल सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमन लॉज-माथेरान विभागात ४ नोव्हेंबर रोजी पुनश्च सेवा सुरू झाल्यापासून ९ डिसेंबरपर्यंत म्हणजे ३६ दिवसांत एकूण २३,४१४ प्रवाशांनी प्रवास केला. याद्वारे रेल्वेला १४ लाख ७३ हजार ५०३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

अमन लॉज-माथेरानची सेवा केवळ पर्यटकांनाच आकर्षित करीत नाही तर माथेरानमधील रहिवाशांसाठीही अतिशय महत्त्वाची आणि आवश्यक वाहतुकीचे साधन आहे. मध्य रेल्वेने अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या सेवा ४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू केल्यानंतर दररोज ४ शटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी पाहून मध्य रेल्वेने १४ नोव्हेंबरपासून अमन लॉज आणि माथेरानदरम्यान आणखी ४ सेवा सुरू केल्या. प्रवाशांचा प्रतिसाद वाढतच गेल्याने १८ नोव्हेंबरपासून आणखी चार फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यामुळे सध्या अमन लॉज आणि माथेरानदरम्यान राेज १२ फेऱ्या हाेतात.

............................

===Photopath===

121220\img-20201212-wa0005.jpg

===Caption===

शटल सेवा

Web Title: Aman Lodge-Matheran shuttle service speeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.