अमर मूलचंदानी याच्या घरात कोट्यवधींचे घबाड, ईडीची छापेमारी, सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:25 AM2023-01-31T10:25:45+5:302023-01-31T10:26:06+5:30

Crime News: अमर मूलचंदानी याच्या निवासस्थानी आणि संबंधित ठिकाणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) केलेल्या छापेमारीदरम्यान दोन कोटी ७२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, ४१ लाख रुपये रोख आणि ४ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.

Amar Moolchandani's house is worth crores | अमर मूलचंदानी याच्या घरात कोट्यवधींचे घबाड, ईडीची छापेमारी, सहा जणांना अटक

अमर मूलचंदानी याच्या घरात कोट्यवधींचे घबाड, ईडीची छापेमारी, सहा जणांना अटक

Next

मुंबई : बनावट कर्ज प्रकरणांना मंजुरी देत पैशांचा अपहार केल्याप्रकरणी सेवा विकास सहकारी बँकेचा माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी याच्या निवासस्थानी आणि संबंधित ठिकाणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) केलेल्या छापेमारीदरम्यान दोन कोटी ७२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, ४१ लाख रुपये रोख आणि ४ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच, या प्रकरणी ईडीने पुण्यातील स्थानिक पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमर मूलचंदानी, अशोक मूलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, साधना मूलचंदानी आणि सागर मूलचंदानी अशा सहाजणांना अटक केली आहे.

पुण्यातील रोझरी एज्युकेशन ग्रुपच्या विनय अर्ना यांच्या कर्ज प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विमानतळ पोलिसांत दाखल झाली होती. या प्रकरणी सेवा विकास सहकारी बँकेच्या सह-निबंधकांनी लेखापरीक्षण केले असता सुमारे ४२९ कोटी रुपये १२६ थकीत कर्ज खात्यात असल्याचे आढळून आले. या लेखापरीक्षणाच्या अहवालानंतर अमर मूलचंदानी याच्या विरोधात अनेक एफआयआर दाखल झाल्या. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याच्या बँकेचा परवानादेखील रद्द केला होता. हे कर्ज मंजूर करतेवेळी अमर मूलचंदानी बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

घरातच लपला होता अमर मूलचंदानी
या प्रकरणी २७ जानेवारी रोजी ईडीने १० ठिकाणी छापेमारी केली होती. विशेष म्हणजे, अमर मूलचंदानी याच्या घरी जेव्हा ईडीचे अधिकारी पोहोचले, तेव्हा अमर याच्या नातेवाइकांकडून त्यांना अटकाव झाला. त्यानंतर सीआरपीएफ अधिकाऱ्यांना देखील तिथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलावले. त्यावेळी त्याच्या घरी तो नसल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. तसेच अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, घराची सखोल तपासणी केली असता तो घरातच एका खोलीत लपून बसला होता आणि ती खोली बाहेरून बंद करण्यात आली होती.

Web Title: Amar Moolchandani's house is worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.