अमराठी माणसांनी उचलला मराठीचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:43 AM2019-06-15T06:43:53+5:302019-06-15T06:44:12+5:30

मराठी ग्रंथाचे लेखन : डी. लीट. मिळाली

Amartya picked up Marathi flag | अमराठी माणसांनी उचलला मराठीचा झेंडा

अमराठी माणसांनी उचलला मराठीचा झेंडा

Next

निशांत वानखेडे 

नागपूर : भाषेचा संबंध कुठल्याही जाती धर्माशी नाही तर तो समाजाशी, संस्कृतीशी जुळला आहे. आपण ज्या राज्यात राहतो, ज्या समाजात वावरतो त्या समाजाची भाषा आपल्या अंगात रुजत असते. मुस्लीम म्हटले की त्यांच्यावर उर्दूचा शिक्का मारला जातो. मात्र या राज्यातील अनेक मुस्लीम सुफी संतांनी, साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक जावेद पाशा व प्राचार्या डॉ. जुल्फी शेख ही नावेही त्यातलीच आहेत. उर्दूपेक्षा मराठीलाच आपली मातृभाषा मानणाऱ्यांनी, तिच्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांनी कायम मराठीचा झेंडा उंचावला आहे.

तिसरीपर्यंत उर्दूत शिकणारे जावेद पाशा यांचा चौथ्या वर्गात मराठीशी संबंध आला आणि ते तिच्या प्रेमात पडले. घरी उर्दू बोलली जायची पण बाहेर सर्व मराठीतूनच. मात्र जावेद यांचे मराठी प्रेम निर्माण झाले ते साहित्यातून. त्यांनी आतापर्यंत ३८ पुस्तकांचे लेखन केले असून मराठी साहित्यातील सर्वच प्रकार हाताळले आहेत. १९८९ मध्ये स्थापन झालेल्या अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या १४ साहित्य संमेलनापैकी सांगली येथील संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्राचार्या डॉ. जुल्फी शेख यांचे मराठी प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांचे वडील मालगुजार होते. त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील सडकअर्जुनी या गावात एकच उर्दू शाळा होती. त्यामुळे मराठीप्रेमी वडिलांनी स्वत: मराठी शाळा सुरू करून दोन्ही मुलींना या शाळेत घातले.
त्या म्हणतात, ‘मराठीएवढे धनाढ्य साहित्य कुठलेच नाही, मराठी ही या राज्यातील मालकीण आहे. डॉ. जुल्फी यांनी कळमेश्वरच्या महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून १४ वर्षे व पुढे
भंडाºयाच्या पटेल कॉलेजमध्ये प्राचार्या म्हणून जबाबदारी सांभाळली. २७ पुस्तकांचे लेखन करणाºया डॉ. जुल्फी यांचा संत नामदेवांचा वाङ्मयीन वारसा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

मराठी महाराष्ट्राची मालकीण
मराठी आता घरातही बोलली जात नसल्याने तिची अवहेलना होत आहे. मराठी ही महाराष्टÑाची मालकीण आहे. ही घराघरात बोलली गेली पाहिजे. माझ्या घरीही मराठीचा आग्रह धरते. महाराष्टÑात जन्मलेल्या प्रत्येकाची मातृभाषा मराठी आहे.
- प्राचार्या डॉ. जुल्फी शेख

महाराष्ट्रात मातृभाषा मराठी आहे. बाकी भाषा त्याच्या खासगी जगण्याशी संबंधित आहेत. मराठीचा जाती-धर्माशी नव्हे, येथील समाजाशी, संस्कृतीशी व भावनांशी संबंध आहे. समतेचा प्रवाह मराठीतून मांडणाºया सुफी संतांची ती भाषा आहे. त्यामुळे सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक प्रथा जोपासण्यासाठी मराठी भाषा, शाळा, साहित्य जगले पाहिजे.
- जावेद पाशा, ज्येष्ठ साहित्यिक

Web Title: Amartya picked up Marathi flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.