अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:44 PM2023-06-19T13:44:38+5:302023-06-19T13:44:54+5:30

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ambadas Danve's Leader of Opposition post likely to be in Danger; Look at the strength of the Legislative Council | अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ!

अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ!

googlenewsNext

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. केवळ दोषारोप करणे आणि लोक पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण न करणे, अशी अनेक कारणे आहेत, असे सांगत यापुढेही अनेकजण इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे मनीषा कायंदे यांनी सांगितले. 

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या ९ झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावार दावा केल्यास अंबादास दानवे यांचं पद जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. 

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरचं विधान परिषदेतील संख्याबळ पुढील प्रमाणे आहे.

  • भाजपा- २२
  • ठाकरे गट- ०९
  • शिंदे गट- ०२
  • राष्ट्रवादी काँग्रेस- ०९
  • काँग्रेस- ०८
  • अपक्षइतर- ०७
  • एकूण रिक्त जागा- २१

एकनाथ शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी-

एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मनीषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनीषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Web Title: Ambadas Danve's Leader of Opposition post likely to be in Danger; Look at the strength of the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.