Join us  

आंबेडकरी रिपब्लिकन पदवीधर शिक्षकांचा महायुतीकडे कल: रिपाइं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 8:50 PM

विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होत आहेत.

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पदवीधर शिक्षक मतदान निवडणुकीत आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील पदवीधर शिक्षकांचा कल महायुतीकडे आहे. त्यामुळे चळवळीतील पदवीधर शिक्षकांच्या मतांवर महायुतीचा उमेदवारांचा प्रचंड मतांनी विजय होईल, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पदवीधर शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानमित्र घनशाम चिरणकर यांनी येथे व्यक्त केला. 

विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होत आहेत. मुंबई, कोकण प्रदेश आणि नाशिक या मतदार संघात बौध्द, मागासवर्गीय बहुजन वर्गातील पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुण तरुणी यांचा टक्का मोठा आहे. या मतदारसंघात बौध्द, मागासवर्गीय, बहुजन, व्यावसायिक, शिक्षक, वर्ग चार पासून वर्ग एक आणि दोन अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात हा वर्ग उच्च पदावर काम करत आहे. हे मतदार रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय असून लोकप्रतिनिधीची निवड करताना अभ्यास करून महायुतीच्या उमेदवारांला निवडणूक देतील असा दावा चिरणकर यांनी केला आहे.

टॅग्स :विधान परिषद निवडणूक 2024