मुंबई विद्यापीठात आंबेडकरांवरील प्रदर्शन सुरू
By admin | Published: April 10, 2016 03:10 AM2016-04-10T03:10:59+5:302016-04-10T03:10:59+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील दुर्मीळ पुस्तकांचे आणि चित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठात भरविण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाचे
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील दुर्मीळ पुस्तकांचे आणि चित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठात भरविण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरूडॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधत, मुंबई विद्यापीठामध्ये १ ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकरांच्या अनेक आठवणींना उजाळा देणाऱ्या त्यांच्यावरील दुर्मीळ पुस्तकांचा परिचय सगळ्यांना व्हावा, या हेतूने आंबेडकरांच्या दुर्मीळ पुस्तकांचे आणि चित्रप्रदर्शनाचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले आहे.
२००हून अधिक दुर्मीळ पुस्तके, चित्र, नाणी, दुर्मीळ लेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला पत्रव्यवहार, त्यांचे ओळखपत्र आणि त्यांच्या आवडत्या गिटारचाही प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन ११ एप्रिलपर्यंतच सुरू राहणार असून, १० ते ६ या वेळेत ते पाहता येणार आहे.