Join us  

अंबरनाथमध्ये १२ नगरसेवक पराभूत

By admin | Published: April 24, 2015 3:53 AM

विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली. निवडणुकीच्या निकालानंतर पालिका सभागृहात ४७ नवीन नगरसेवक दिसणार आहेत.

अंबरनाथ पालिका निवडणुकीत १२ नगरसेवकांना पराभवाची धूळ चाखावी लागली, तर १० विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली. निवडणुकीच्या निकालानंतर पालिका सभागृहात ४७ नवीन नगरसेवक दिसणार आहेत. ५० टक्के महिला आरक्षणामुळे अनेक नगरसेवकांना आपल्या प्रभागातून महिलांना उमेदवारी द्यावी लागली. ५० पैकी २२ नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीची संधी मिळाली. त्यातील १२ नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. सुधा गायकवाड, कबीर गायकवाड, धनंजय सुर्वे, याकुब मीरा सय्यद, संदीप लाकडे, वंदना पाटील, परशुराम जाधव, ग्रेसी सिद्धार्थन, फातिमा शेख, लतिका कोतेकर, स्वप्नील बागुल आणि पौर्णिमा कबरे यांचा समावेश आहे. कहीं खुशी कहीं गम...जे १० नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत, त्यात पंढरी वारिंगे, अब्दुल शेख, प्रदीप पाटील, वृषाली पाटील, राजेंद्र वाळेकर, मनीषा वाळेकर, रमेश गुंजाळ, शरीफ शेख, ज्योत्स्ना भोईर आणि सदाशिव पाटील यांचा समावेश आहे. काही माजी नगरसेवकही या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यात राजू शिर्के, संदीप लोटे, भरत फुलोरे, सुभाष साळुंखे, उमर इंजिनीयर यांचा समावेश आहे. काही माजी नगरसेवकांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यात वैशाली बिर्जे, बबन तांबे, रजनी जाधव, पांडुरंग खराडे, बिस्मिल्ला शेख, हिरा गुप्ता, लालमन यादव आणि गणेश कोतेकर यांचा समावेश आहे.