अंबरनाथ: अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. बदलापूरात ४२ प्रभागांसाठी १५७ उमेदवार रिंगणात आहेत. तर अंबरनाथमध्ये ५३ प्रभागांसाठी ३१६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीआधीच बदलापूरात पाच तर अंबरनाथमध्ये ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे हे विशेष! कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या ४२ प्रभागांसाठी ११७ मतदान केंद्र तेवढेच केंद्रप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रत्येक केंद्रावर ५ असे सुमारे ५८५ कर्मचारी तैनात असणार आहेत. मतदान केंद्राचे १७ झोन तयार करण्यात आले असून त्यामध्ये १७ झोनल अधिकारी काम पाहणार आहेत. त्याशिवाय निवडणुकीच्या कामासाठी २७ मिनीबस व १७ जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारीया यांनी बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राला भेट दिली. अंबरनाथमध्ये ५३ जागेसाठी १६५ मतदान केंद्र उभारली असून या केंद्रावर दीड हजार कर्मचारी काम पाहणार आहेत. १६५ केंद्रांवर तेवढेच केंद्र प्रमुख असतील. ५७ वाहनांचा वापर यावेळी होणार आहे. (प्रतिनिधी)
अंबरनाथ-बदलापूरात आज अग्निपरिक्षा
By admin | Published: April 22, 2015 6:00 AM