अंबोली पोलिसांकडून २ कोटींचे ‘एमडी’ हस्तगत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 07:11 AM2018-02-01T07:11:49+5:302018-02-01T07:11:54+5:30

अंबोली पोलिसांनी मुंबईतून एमडीचा मोठा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले दोघे हे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया कैलाश राजपूत याच्या टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे.

Amboli police get 2 crore 'MD' | अंबोली पोलिसांकडून २ कोटींचे ‘एमडी’ हस्तगत!

अंबोली पोलिसांकडून २ कोटींचे ‘एमडी’ हस्तगत!

googlenewsNext

मुंबई : अंबोली पोलिसांनी मुंबईतून एमडीचा मोठा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले दोघे हे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया कैलाश राजपूत याच्या टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुंबईतील कनेक्शन उघड करत, त्याचा कणा मोडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आले असून, यात दोघांच्या मुसक्या एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने आवळल्या.
शहरात अमलीपदार्थांची विक्री करणाºया इसमाविरोधात कारवाई करण्याची मोहीम मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येत आहे, ज्यात परिमंडळ ९चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंह दहिया यांच्या मार्गदर्शनात, अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली एका ‘खास’ पथकाची नियुक्ती केली होती. काही लोक अंबोली परिसरात ‘एमडी’ घेऊन येणार असल्याची माहिती सोमवारी नायक यांना मिळाली. त्यानुसार, अंधेरीच्या शास्त्रीनगर परिसरात नायक आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. एक पांढºया रंगाची अर्टिका कार त्या ठिकाणी आली. त्यात दोन इसम बसले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नायक यांनी पुढे जात त्या दोघांची चौकशी केली. तेव्हा त्यातील कृष्णा दिवेश चौधरी (३१) याच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी त्यांना दिसली, ज्यात १ किलो एमडी त्यांना सापडले. त्यामुळे त्याचा साथीदार मुकेश कृष्णा टाकले (३१) याचीदेखील झडती घेण्यात आली, तेव्हा त्याच्याकडेदेखील १ किलो एमडी सापडले. या दोघांकडून १३ किलो ५०० ग्रॅम ‘एमडी’ पोलिसांनी हस्तगत केले आहे. या दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी माफिया राजपूतचे नाव घेतले आहे. मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ या टोळीने मुंबईत आणल्याचा संशय तपास अधिकाºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हस्तगत करण्यात आलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २ कोटी ६८ लाख ४० हजार रुपये आहे, तसेच जवळपास ५ लाख रुपये किमतीची कार आणि १,२००ची रोख रक्कम मिळून २ कोटी ७३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नवीन वर्षात ही मुंबईतील मोठी कारवाई मानली जात आहे. अटक आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एक कुरिअर बॉय, तर दुसरा कारचालक
नायक यांच्या पथकाने अटक केलेला चौधरी हा व्यवसायाने कुरिअर बॉय आहे, तर टाकले हा कारचालक आहे. त्यामुळे यापूर्वीदेखील त्यांनी अमलीपदार्थांची ने-आण केल्याचा संशय पोलिसांना आहे.
घरात लपविले सव्वादोन कोटींचे ‘एमडी’!
कुरिअर बॉय असलेला चौधरी हा कांदिवली, एकतानगरमधील सप्तरूपी सोसायटीत राहतो, तर त्याचा साथीदार कारचालक टाकले हा दहिसरच्या डॉ. मस्केरन्सवाडीमध्ये लक्ष्मीनारायण सोसायटीतील रहिवासी आहे. याच ठिकाणी टाकलेने जवळपास सव्वादोन कोटींचे एमडी लपविले होते, जे पोलिसांनी हस्तगत केले.

Web Title: Amboli police get 2 crore 'MD'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.