सी-लिंकवर रुग्णवाहिका गरजेची - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:56 AM2020-01-09T05:56:56+5:302020-01-09T05:57:02+5:30

वांद्रे-वरळी सी-लिंकवर रुग्णवाहिका सेवेत असणे आवश्यक आहे आणि त्याबाबत विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) ला बुधवारी दिले.

Ambulance Needed on C-Link - High Court | सी-लिंकवर रुग्णवाहिका गरजेची - हायकोर्ट

सी-लिंकवर रुग्णवाहिका गरजेची - हायकोर्ट

Next

मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर रुग्णवाहिका सेवेत असणे आवश्यक आहे आणि त्याबाबत विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) ला बुधवारी दिले.
अनेक जण वेगमर्यादेचे उल्लंघन करत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्याकरिता तेथे रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने म्हटले.
महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर अत्याधुनिक रुग्णवाहिका व ट्रॉमा सेंटर नसल्याने अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारला महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णवाहिका व ट्रॉमा सेंटर उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका असोसिएशन फॉर एडिंग जस्टिस या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर एमएसआरडीसीने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध केल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने वांद्रे-वरळी
सी-लिंकवरही रुग्णावहिका सेवेत ठेवली आहे का? अशी विचारणा एमएसआरडीसीकडे केली.
‘वांद्रे-वरळी सी-लिंकवर अनेक कार वेगमर्यादेचे उल्लंघन करतात. कॅमेरे लावून या कारमालकांकडून
दंड वसूल करू शकता. मात्र, या ठिकाणी रुग्णवाहिका सेवेत असणे आवश्यक आहे,’ असे म्हणत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

Web Title: Ambulance Needed on C-Link - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.