Join us

‘सरकारकडून रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:51 AM

मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये अपघातानंतर गोल्डन अव्हरमध्ये प्रवाशांना उपचार मिळण्यासाठी प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये अपघातानंतर गोल्डन अव्हरमध्ये प्रवाशांना उपचार मिळण्यासाठी प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. रुग्णवाहिका राज्य सरकार देते आणि ती उभी करण्यास जागा रेल्वे देते. राज्य सरकारला वारंवार रुग्णवाहिकेबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र राज्य सरकारकडून रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे विधान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केले आहे. मध्य रेल्वेच्या ‘एक सफर रेल के साथ’ या प्रवासी जागरूकता अभियानांतर्गत अमिताभ बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांचा सहभाग असलेल्या व्हिडीओचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पार पडले. या कार्यक्रमात महाव्यवस्थापक शर्मा बोलत होते.