एएमसी संचिता पिंपळे हल्लाप्रकरण:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:43+5:302021-09-02T04:14:43+5:30

पालिकेच्या सहायक आयुक्त आणि उपायुक्तांचे मत गौरी टेंबकर - कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाणे सहायक आयुक्त संचिता ...

AMC Sanchita Pimple Attack Case: | एएमसी संचिता पिंपळे हल्लाप्रकरण:

एएमसी संचिता पिंपळे हल्लाप्रकरण:

Next

पालिकेच्या सहायक आयुक्त आणि उपायुक्तांचे मत

गौरी टेंबकर - कलगुटकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ठाणे सहायक आयुक्त संचिता पिंपळे, त्यांच्या सुरक्षारक्षकावरील जीवघेणा हल्ला दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आला. अधिकाऱ्यांनी कारवाई करूच नये, हा त्यामागील हेतू असावा. असले प्रकार टाळण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलत ‘हॉकर्स पॉलिसी’ लवकरात लवकर अंमलात आणणे गरजेचे आहे, असे मत पालिकेचे सहायक आयुक्त तसेच उपयुक्तांकडून मांडले गेले.

नेहमी ‘ॲडव्हान्स’ अर्ज देणे अशक्य

“मला नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच अनेक संस्था व्हॉट्सॲप, एसएमएसवर संपर्क करत फेरीवाल्यांविरोधात तक्रार करतात. कारवाईसाठी पोलीस संरक्षण हवे असल्यास ‘ॲडव्हान्स’मध्ये अर्ज करावा लागतो. जो रोजच्या कारवायांसाठी शक्य होत नाही. पोलीस संरक्षण तातडीने मिळावे यासाठी तरतूद गरजेची आहे.

- संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त, आर दक्षिण विभाग

..............................................

‘हॉकर्स पॉलिसी’ची अंमलबजावणी करावी

“गेली १६ वर्षे सहायक आयुक्तपद सांभाळत मोठमोठ्या तोडक कारवाया स्वतः लीड केल्या आहेत. पिंपळे या डॅशिंग अधिकाऱ्यावर हल्ला करत गुन्हेगार कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल उचलत गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अडकलेल्य ‘हॉकर्स पॉलिसी’ची अंमलबजावणी केल्यास हे प्रकार थांबतील. पालिकेलादेखील महसूल मिळेल.

- डॉ. भाग्येश्री कापसे, पालिका उपायुक्त, परिमंडळ ७

..........................................

पालिका सुरक्षारक्षकांना शस्त्र द्या

''अनधिकृत बांधकामे असो वा फेरीवाले, ठाण्यासारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक सहायक आयुक्तांच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षकांना पूर्वीप्रमाणे नियमांतर्गत राहून शस्त्र देण्यात यावे किंवा सहायक आयुक्तासोबत पोलीस तैनात करावेत.

- मकरंद दगडखैर, सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग

..........................................................

हल्ला पूर्वनियोजित नव्हता

''आम्ही हल्लेखोराकडे चौकशी केली आहे. त्यानुसार हल्ला पूर्वनियोजित नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत.''

- डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५

Web Title: AMC Sanchita Pimple Attack Case:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.