अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील अमिना मेन्शनचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:55 AM2018-08-10T01:55:56+5:302018-08-10T01:56:42+5:30
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गुरुवारी लिलाव झाला.
Next
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गुरुवारी लिलाव झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या या लिलावात सैफी बुºहाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी)ने ३.५१ कोटींची बोली लावत ही मालमत्ता विकत घेतली. केंद्र सरकारच्या स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स (सफेमा) कायद्याअंतर्गत दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला.
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदच्या एकूण दहा मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी अमिना मेन्शन ही शेवटची मालमत्ता होती. यापूर्वी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात दाऊदच्या तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता.