अमेरिकेच्या फॅशन डिझायनरची ‘टेक्नाॅलॉजी’ चोरली; ८० कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:32 PM2023-07-20T12:32:56+5:302023-07-20T12:33:12+5:30
माटुंग्यातील रहिवासी असलेले प्रदीपकुमार मुरारीलाल शर्मा (५४) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमेरिकेतील फॅशन डिझायनरच्या विशेष तंत्रांची चोरी करून तिची ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये मुंबईसह इटलीतील एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद असून, फॅशन डिझायनर महिलेच्या सहकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
माटुंग्यातील रहिवासी असलेले प्रदीपकुमार मुरारीलाल शर्मा (५४) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०१७ ते जून २०२३ दरम्यान इटलीचे व्हेलेंटिनो लुडोविको, व्हेलेंटिना एस. पी. ए. कंपनी, पियर पिचिओली, सिल्व्हिया फारिसाटो, जकोपो व्हेंटुरिनी यांच्यासह मुंबईतील शीला बूलचंदानी व विवेकानंद बूलचंदानी यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी ही फसवणूक केली. त्यांच्याविरुद्ध फसवणूक, धमकावणे, कट रचणे व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.