Join us

भारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 3:05 AM

मुंबई : भारतातून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा काहीसा घटला असून त्याचवेळी अमेरिकेतून भारतात येणाºया विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मात्र वाढ ...

मुंबई : भारतातून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा काहीसा घटला असून त्याचवेळी अमेरिकेतून भारतात येणाºया विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मात्र वाढ झाली असल्याचे ओपन डोअर्स या अहवालातून समोर आले आहे. अमेरिकेच्या शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशन या संस्थेकडून हा अहवाल जाहीर करण्यात आला.

अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यंदा भारतातील अमेरिकी विद्यार्थ्यांची संख्या ही ४ हजार ७०४ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत १२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे की, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित या विषयांचा समावेश असलेल्या स्टेम विषयांचा कठीण अभ्यासक्रम करणे बºयाच अमेरिकन विद्यार्थ्यांना झेपत नाही वा या विषयांच्या अभ्यासासाठी झोकून देणे त्यांना आवडत नाही. स्टेम अभ्यासक्रमामध्ये सायन्स (विज्ञान), टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान), इंजिनीअरिंग (अभियांत्रिकी) आणि मॅथेमॅटिक्स (गणित) यांचा समावेश होतो. त्यामुळे अमेरिकन विद्यार्थी सामाजिक शास्त्रे, भारतीय कला, भारतीय संस्कृती, बुद्धिस्ट स्टडीज् या विषयांच्या अभ्यासास प्राधान्य देत असल्याचे दिसते.येणाºया विद्यार्थ्यांमध्ये आशियाई आफ्रिकी वंशाचे आणि अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. ओपन डोअर्स अहवाल हा इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) या संस्थेकडून जाहीर केला जातो. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या, स्थिती दर्शवणारा हा अहवाल आहे. सध्या अमेरिकेत शिक्षण घेणाºया भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही दीड लाखापेक्षा अधिक आहे. मात्र भारतात शिक्षण घेणाºया अमेरिकन विद्यार्थ्यांची २००७ - ०८ मध्ये असणारी संख्या ९४,५६३ वरून वाढून २०१७ - १८ मध्ये १.९६ लाखांवर गेली आहे.अमेरिकेत शिक्षण महागच्गेली पाच वर्षे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची एकूण संख्या दरवर्षी वाढते आहे. मात्र यंदा रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण पाहता अमेरिकेत शिक्षण घेणे महाग झाले आहे. याचाच परिणाम म्हणून यंदा ही संख्या दहा हजारांवर आली आहे. 

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्रमुंबईअमेरिका