Join us

कंगनाचं मुंबईतील कार्यालय पालिकेकडून सील; शिवसेनेसोबतचा पंगा महागात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 12:33 PM

मुंबईतील कार्यालयाबाहेर पालिका अधिकाऱ्यांनी नोटीस लावली; निवासी जागेचा कार्यालयीन वापर

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना आता कंगनाचं मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या रडारवर आहे. काल पालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केली. यानंतर आज कार्यालयाबाहेर नोटीस लावण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. कंगनानं नियमांचं उल्लंघन केल्यानं तिच्या कार्यालयाबाहेर ३५४ अ अंतर्गत नोटीस चिकटवण्यात आली आहे. कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असे पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोलापालिकेच्या नोटिशीत एक छायाचित्रदेखील आहे. कार्यालयात कोण कोणता भाग कागदपत्रांनुसार अयोग्य आहे, ते या छायाचित्रात दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री जानेवारीत कंगनानं या मालमत्तेचे नुतनीकरण करून तिथे कार्यालय स्थापन केलं. मात्र, या जागेचा निवासी वापर बदलून व्यावसायिक केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. सोमवारी केलेली पाहणी आणि मंजूर आराखड्याच्या आधारे पालिकेचे पथक दोन दिवसांत अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर लगेचच पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल, असं पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा

सध्या कंगना हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी असून मुंबईत ती खारमध्ये राहते. तर वांद्रे येथील पाली हिलमध्ये तिचे मनिकर्णिका फिल्म या नावाचं कार्यालय आहे. पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. कंगनाने जानेवारीत या कार्यालयाचे उद्घाटन केलं होतं. येथे सध्या रंगरंगोटी सुरू आहे.आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

अन्यथा कंगनाला व्हावे लागेल होम क्वारंटाइन कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. ती विमानमार्गे मुंबईत आल्यास तिला नियमानुसार १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेला हा नियम आहे. महापालिका फक्त त्याची अंमलबजावणी करीत आहे. कंगना सात दिवसांपेक्षा कमी दिवस मुंबईत राहणार असेल तर होम क्वारंटाइनचा नियम तिला लागू होणार नाही, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा

कंगना-राऊत दोघांचेही सूर नरमलेशिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील शब्दिक युद्धाने सोमवारी काहीसा नरमाईचा व खुलासेवजा सूर आळवला. एकीकडे कंगनाने 'मला महाराष्ट्र आवडतो' असे ट्विट करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर, आम्हाला शिवसेना प्रमुखांनी महिलांच्या सन्मानाची शिकवण दिल्याचे ट्विट राऊत यांनी केले. राऊत विरूद्ध राणौत वाद सध्या गाजत आहे.

राऊत यांनी कंगनाचा हरामखोर असा केलेला उल्लेख केल्याबद्दल समाज माध्यमातून ठपका ठेवला जात आहे. त्यामुळे राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली. आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. मात्र काहीजण खोडसाळपणे शिवसेनेने महिलांचा अपमान केला अशी चुकीची माहिती पसरवत आहेत. हरामखोर या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर, कंगनाने महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट ऑफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. प्रचंड विरोध सहन केला, त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो, असे ट्विट कंगनाने केले.

टॅग्स :कंगना राणौतसंजय राऊतमुंबई महानगरपालिकाशिवसेना