अमित भाईंनू नाम लवु छू खाई ने फाफडा-ढोकळा!

By Admin | Published: September 30, 2014 02:37 AM2014-09-30T02:37:45+5:302014-09-30T02:37:45+5:30

चलाùù बाई.. भोंडला खेळून दमलोत आपण. डबे उघडा आता. आज कुणी-कुणी खिरापत आणलीय गं आपापल्या घरातून येताना? माङया डब्यात तर ‘क:हाडी ठेचा’ भरलाय, पाहिजे का कुणाला?

Amit Bhainanu named Luvu Chhoo Khai gave a goose-brace! | अमित भाईंनू नाम लवु छू खाई ने फाफडा-ढोकळा!

अमित भाईंनू नाम लवु छू खाई ने फाफडा-ढोकळा!

googlenewsNext
>(स्थळ : नवरात्रोत्सवातला ‘भोंडला’ खेळायला राजकीय नेत्यांच्या सौभाग्यवती एकत्र जमलेल्या. यावेळी खिरापत खात-खात रंगलेल्या राजकीय उखाण्यांचा हा भन्नाट ‘ऑँखो देखा हाल’.)
पृथ्वीराज सौ. : चलाùù बाई.. भोंडला खेळून दमलोत आपण. डबे उघडा आता. आज कुणी-कुणी खिरापत आणलीय गं आपापल्या घरातून येताना? माङया डब्यात तर ‘क:हाडी ठेचा’ भरलाय, पाहिजे का कुणाला?
अजितदादा सौ. : (दचकून नकारार्थी मान हलवत) नक्कोùù गं बाई. तुमच्याकडंच्या ठेच्यामुळं म्हणो आमच्या दादासाहेबांना लागतोय सारखा ठसका. त्यापेक्षा ‘ठाकरे वहिनीं’चा डिंकलाडू द्या. आवडेल मला.
माणिकराव सौ. : (खोचकपणो) आता आवडणारच नां, त्यांच्या हातचं. माझी खिचडी थोडीच पसंत पडणार तुम्हाला ? 
राज सौ. : गेल्या महिन्यात पवार वहिनींना मी खास नाशकातला चिवडा खाऊ घातला होता होùù आवडीनं. आमच्या दोघींचे साहेब आतल्या अॅन्टीचेंबरमध्ये ‘पालिका-पालिका’ म्हणत काहीतरी गप्पा मारत होते, तेव्हा झाली होती आम्हा दोघींची भेट.
भुजबळ सौ. : (फणका:यानं) अन् मला तर काडीचीही कल्पना नाही याची. एवढं पण लपवून ठेवू नये बाई कधी, आपल्याच माणसांपासून.
सुशीलकुमार सौ. : ए चलाùù गं.. पटापटा उखाणो घ्या. लवकर-लवकर आटपा. अजून मला लेकीच्या प्रचाराला जायचंय. 
उद्धव सौ. : पहिला उखाणा मीच घेते. ऐका मग. ‘कमळाच्या पाकळ्यात बाई, निघाला खंजीर.. आमच्या उद्धवरावांना आवडतो, मराठी मातीतला अंजीर.’
देवेंद्रपंत सौ. : (उखाण्याला उखाण्यातूनच उत्तर देत) खुर्चीसाठी म्हणो बाई सेनापतींचा बालहट्ट.. आमच्या देवेंद्रपंतांचा बघा, कसा दिल्लीतही वट्ट!
तावडे सौ. : (आपणही कमी नाही, हे दाखवविण्यासाठी लगेच पुढं सरसावत) जाकिटात जाकीट, मोदींचं जाकीट.. विनोदरावांच्या खिशात, सीएम खुर्चीचं तिकीट.
अजितदादा सौ. : (अस्सल बारामती भाषेत नव्या स्टाईलचा उखाणा सादर करत) मी ह्यांना सांगितलं, नका हो ‘हात’ सोडू.. तेव्हा अजितराव कौतुकानं म्हणाले, तुङयासाठी ‘कमळ’ही तोडू!
रामदास सौ. : (कवितेची वही उघडत) दिल्ली दरबाराला साक्षी ठेवून, आज घेते मी उखाणा.. रामदासांना सांगून थकले, एकदा तरी लाल दिवा आणा.
अमितभाई सौ. : (कोल्हापूरच्या माहेराची आठवण करत) ‘महालक्ष्मी’च्या दर्शनानंतर पाहायलाच हवा रंकाळा. अमित भाईंनू नाम लवु छू, खाई ने फाफडा -ढोकळा.
आर. आर. आबा सौ : आता माझा शेवटचा उखाणा ऐका. ‘सिटीत सिटी, मुंबई बडी सिटी.. आमच्या आबांच्या हिंदीमुळं बजती है, पाùùर सबकीच सिटी!’
                                        - सचिन जवळकोटे

Web Title: Amit Bhainanu named Luvu Chhoo Khai gave a goose-brace!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.