Join us

कलावती यांच्या विषयी अमित शाह खोटं बोलले, भाजपचे नुकसान होणार; बच्चू कडू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:16 PM

लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यवतमाळ येथील महिला कलावती यांच्या संदर्भात माहिती दिली होती.

मुंबई- १५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भ दौऱ्यावर आले असताना त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती बांदूरकर यांच्या झोपडीला भेट देऊन आत्महत्येमागील परिस्थिती जाणून घेतली होती. संसदेत कलावतीचा विषय निघाल्याने राहुल गांधींची ती भेट पुन्हा चर्चेत आली. या भेटीनेच कलावतीचे आयुष्य बदलून टाकले. लोकसभेत दोन दिवसापूर्वी पुन्हा हा विषय चर्चेत आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भात चर्चा करत असताना. आम्हीच कलावती यांनी मदत दिली असल्याचा दावा केला. यानंतर यवतमाळ येथील कलावती यांनी प्रतिक्रीया देत मला मदत काँग्रेस सरकारनेच दिली असल्याचं सांगितलं, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रीया दिली. 

महिंद्राचे 'तारा सिंग'ला खास गिफ्ट; सनी देओलने मानले आनंद महिंद्रांचे आभार

आमदार बच्चू कडू म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कलावती यांच्या संदर्भात लोकसभेत स्टोरी वेगळीच बनवली आहे. त्यांनी कलावती ही उत्तराखंडची असल्याच म्हटले. शाह यांनी मुद्दा उचलला पण तो चांगलाच आपटला. खोट बोला पण रेटून बोला असं झाले आहे. एवढ्या लहान विषयावर त्यांनी लोकसभेत बोलावं, आणि तेही खोट बोलावं हा चिंतेचा विषय आहे, यामुळे भाजपचेच नुकसान आहे, असंही बच्चू कडू म्हणाले. 

कलावतीला राहुल गांधींनी की मोदींनी मदत केली?

१५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भ दौऱ्यावर आले असता त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती बांदूरकर यांच्या झोपडीला भेट देऊन आत्महत्येमागील परिस्थिती जाणून घेतली होती. संसदेत कलावतीचा विषय निघाल्याने राहुल गांधींची ती भेट पुन्हा चर्चेत आली. या भेटीनेच कलावतीचे आयुष्य बदलून टाकले.  

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या या घटनेनंतर २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अचानक जळका  गावी जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कलावती यांच्या झोपडीवजा घराला भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या घरी चहाही घेतला. त्यानंतर दिल्लीला परतल्यावर लोकसभेच्या सभागृहात राहुल यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा सभागृहात मांडत कलावतीचा मुद्दा उपस्थित केला. संसदेतील या चर्चेने कलावती या देशभरात प्रकाशझोतात आल्या होत्या.  

टॅग्स :बच्चू कडूराहुल गांधीअमित शाहभाजपा