मुंबई- 2019ला शिवसेना भाजपाबरोबरच असेल, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. 2019ला भाजपा पुन्हा सत्ता मिळवेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. भाजपाची शिवसेनेबरोबर युती होणार असून, लोकसभा निवडणुकीला आम्ही युती करूनच सामोरे जाऊ, असंही अमित शाह म्हणाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबते सुरू आहेत. सत्तेत सहभागी असलेला शिवसेना पक्ष आणि त्यांच्याकडून होत असलेली टीका यावरही अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, भाजपा शिवसेनेच्या टीकेला यापुढे प्रत्युत्तर देणार नसल्याचं भाजपाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.विरोधकांची महाआघाडी हा एक प्रकारचा भ्रम असून, महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, असा टोलाही अमित शाहांनी लगावला आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकमेकांना साथ देऊ शकत नसल्याचंही अमित शाहांनी स्पष्ट केलं आहे. 2019मध्ये भाजपा ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल आणि ओडिशात सत्ता हस्तगत करेल, असा विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला आहे. 2014मध्ये भाजपाची सहा राज्यांत सत्ता होती, आता 16 राज्यांत सत्ता आहे. त्यामुळे 2019ची लोकसभा आम्हीच जिंकू, असंही ते म्हणाले आहेत.
सेना-भाजपा युती करूनच 2019च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ- अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 12:33 PM
2019ला शिवसेना भाजपाबरोबरच असेल, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे.
ठळक मुद्दे2019ला शिवसेना भाजपाबरोबरच असेल, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला.भाजपाची शिवसेनेबरोबर युती होणार असून, लोकसभा निवडणुकीला आम्ही युती करूनच सामोरे जाऊविरोधकांची महाआघाडी हा एक प्रकारचा भ्रम असून, महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही