Join us

अमित शाह यांचा २४ तारखेचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौरा रद्द: रविंद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 1:56 PM

रविंद्र चव्हाण म्हणाले, २४ तारखेला भाजपाचे नेते विनोद तावडे येणार आहेत. ते महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार होते. पण, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा नेरे रविंद्र चव्हाण यांनी दिली.अमित शाह २४ तारखेला येणार होते. पण, वातावरणातील बदलामुळे हा दौरा रद्द झाला आहे. लवकरच दोऱ्याची पुढील तारीख जाहीर केली जाईल, असंही चव्हाण म्हणाले.

रविंद्र चव्हाण म्हणाले, २४ तारखेला भाजपाचे नेते विनोद तावडे येणार आहेत. ते महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेणार आहेत. 

"महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहर आणि गावपातळीवर काम करण्यासाठी एकत्र आले आहेत. ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या अडचणी वरिष्ठ सोडवत आहेत. महायुतीतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत.  होणाऱ्या मतदानापैकी ७० टक्के पेक्षा जास्त मतदान महायुतीला कसे होईल यासाठी नियोजन सुरू आहे, असंही रविंद्र चव्हाण म्हणाले.

आम्ही १०० टक्के मतदान करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, मोठ्या संस्था त्यासाठी काम करत आहेत. मतदान चांगलं होईल यात शंका नाही, ज्या ठिकाणी मतदान झालं आहे त्या ठिकाणी जास्त उष्णता आहे त्यामुळे लोक मतदानासाठी बाहेर पडत नाही, असंही चव्हाण म्हणाले. प्रत्येकाला माहित आहे हे मतदान देशासाठी आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे एक व्हिजन आहे. त्यामुळे तरुण वर्ग मोदींच्या बाजूने येत असल्याचं दिसत आहे, असंही रविंद्र चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :अमित शाहलोकसभा निवडणूक २०२४