मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 11:18 AM2020-01-23T11:18:49+5:302020-01-23T11:43:43+5:30

मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांना लाँच करण्यात आलं आहे.

Amit Thackeray launches in MNS | मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

Next
ठळक मुद्देमनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांना लाँच करण्यात आलं आहे.युवा पिढीशी संबंधित जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. युवांच्या जबाबदाऱ्या, तरुणांना आकर्षित करण्यासाठीच अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात मनसेनं उतरवलं आहे.

मुंबई- मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांना लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे मनसेमध्ये अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी मिळणार आहे. युवा पिढीशी संबंधित जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जेणेकरून पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते तयार होतील. युवांच्या जबाबदाऱ्या, तरुणांना आकर्षित करण्यासाठीच अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात मनसेनं उतरवलं आहे.

2018मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतल्या मनसेच्या सर्वच शाखांना अमित ठाकरेंनी भेट दिली होती. विद्यार्थी संघटनांसाठीही अमित ठाकरेंनी काम केलेलं आहे. मुंबई, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांवर अमित ठाकरेंची नजर राहणार असून, ते काम करणार आहेत. युवांना आपल्या पक्षासोबत आणण्याची जबाबदारी अमित राज ठाकरेंकडे सोपवण्यात आली आहे. अमित ठाकरेंकडे राज ठाकरेंचा आधारस्तंभ म्हणून पाहिलं जातं. यापूर्वीही अमित ठाकरेंनी काही आंदोलनांचं नेतृत्व केलं होतं. जवळपास दीड महिन्यांपूर्वी अमित ठाकरेंनी नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या थाळीनाद मोर्चा काढला होता. याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.


अमित ठाकरेंनी नवी मुंबईत मोर्चाचं नेतृत्व केल्यानंतर आता ते राजकारणात सक्रिय होत आहेत. रेल्वेच्या प्रश्नांवरदेखील अमित ठाकरेंनी अनेकदा आवाज उठवला आहे. याशिवाय आरेतील मेट्रो कारशेडचा वाद तापला असताना त्यांनी आंदोलकांची भेटदेखील घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून ते मनसेच्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेटीगाठीदेखील घेत आहेत. अमित ठाकरे अनेकदा राज ठाकरेंच्या सभांना उपस्थित राहिले आहेत. मात्र ते कायम व्यासपीठासमोरील भागात दिसले आहेत. आता तेच व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करताना पाहायला मिळतील. 

Web Title: Amit Thackeray launches in MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.