'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:01 PM2021-02-03T15:01:35+5:302021-02-03T15:10:11+5:30

मनसेकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षातीने नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

amit thackeray will taking responsibilities in bmc election 2021 | 'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली

'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली

googlenewsNext

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कंबर कसली आहे. कल्याण-डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम केल्यानंतर आज 'कृष्णकुंज'वर खलबतं झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. राज ठाकरे यांनी या बैठकीत मनसेच्या नेत्यांना महापालिका निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावरही मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मनसेकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक विभागासाठी दोन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. यात अमित ठाकरे यांच्याकडे मुंबईतील उत्तर पूर्व मतदार संघातील वॉर्डांची जबाबदारी असणार आहे. अमित ठाकरे यांच्यासोबतीले मनसेचे नेते संदीप देशपांडे असणार आहेत. मुंबईच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील सर्व वॉर्डातील प्रचाराची आणि निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे असणार आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या वृत्ता दुजोरा दिला आहे. 

"प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

"अमित ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठीची जबाबदारी स्वीकारली आहे. अमित अत्यंत संयमी आहे. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला उत्तर पूर्वमध्ये चांगलं यश मिळेल. त्याची मेहनतीची संपूर्ण तयारी आहे", असं बाळा नांदगावकर म्हणाले. 'कृ्ष्णकुंज'वर झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईप्रमाणे ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली यासाठी एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली जाणार आहे.

मनसेला कल्याण-डोंबिवलीत धक्का
मनसेला गेल्या दोन दिवसांत सलग दोन मोठे धक्के बसले आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसऱ्याच दिवशी मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मुंबईत 'कृष्णकुंज'वर मनसे नेत्यांची तातडीची बैठक राज ठाकरे यांनी घेतली. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षफुटीला आळा घालण्याचं आव्हान मनसेसमोर असणार आहे. 

Web Title: amit thackeray will taking responsibilities in bmc election 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.