Join us

चाळ माफीयांची पळापळ !

By admin | Published: December 13, 2014 10:35 PM

वसई-विरार शहर महानगरपालिकेने पुन्हा अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिम प्रभावीरित्या राबवण्यास सुरूवात केली आहे.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने पुन्हा अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिम प्रभावीरित्या राबवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवडय़ाभरात वसई, नालासोपारा, विरार परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे अतिक्रमण विरोधी पथकाने उध्वस्त केली. लवकरच चंदनसार, विरार पूर्व, विरार बायपासरोड, नालासोपारा पूर्व भागातील धानीव, धानीवबाग, बिलालपाडा, संतोषभुवन, वसईतील सातिवली, वालीव, कामण, उमेळमान या भागातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहेत.
वसई-विरार उपप्रदेशातील सुमारे 4क् ते 5क् हजार अनधिकृत इमारतीमुळे महानगरपालिकेच्या नागरीसुविधा देणा:या यंत्रणावर विपरित परिणाम जाणवू लागला आहे. या सर्व बांधकामांवर कारवाई करण्यात महानगरपालिकेचे अनेक अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. 3 वर्षापूर्वी महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी झालेल्या मोहिमेत सुमारे 7 हजार अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. त्यानंतर मात्र या कारवाईस स्थगिती मिळाली. त्याचा फायदा घेत अनेक चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले व पुन्हा अनधिकृत बांधकामे डौलाने उभी राहीली. या सर्व प्रकरणी महानगरपालिका बदनाम झाल्यामुळे आयुक्तांनी सरसकट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गेल्या आठवडाभरात अनेक बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला. काल बिलालपाडा येथे झालेल्या कारवाईमध्ये अनधिकृत रित्या उभारण्यात आलेली 4 मजली इमारत प्रभारी सहा. आयुक्त निलम निजाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. दरम्यान वसई-विरार उपप्रदेशातील अनधिकृत इमारती दंड आकारून नियमीत करण्यात येणार असल्याची जोरदार अफवा चाळमाफीयांनी पसरवली होती. परंतु महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद राठोड यांनी त्याचा इन्कार केला व प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अनधिकृत बांधकामासंदर्भात महानगरपालिकेने कडक धोरण स्वीकारले असून लवकरच विरार, नालासोपारा व वसई पूर्व भागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)