मुंबई-येत्या दि,20 मे रोजी मुंबईत होणारी खासदारकीची निवडणूक ही,विद्यमान उमेदवारांसाठी महत्वाची आहे.त्यामुळे या दरम्यान येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या सण आणि उत्सवांना त्यांना जातींने हजर राहावे लागते.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी गोरेगाव विधानसभेत महावीर जन्म कल्याणक शोभायात्रेत सहभागी होऊन भगवान महावीर स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. तर 'समस्त दिगंबर जैन कासार समाज मंडळ, सर्वोदय नगर जोगेश्वरी पूर्व' यांच्यावतीने आयोजित भगवान महावीर जन्म कल्याण उत्सवात सहभागी होऊन त्यांनी महावीर स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थित जैन कासार समाज बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मंडळांनी सत्कार करून सन्मानित केले व निवडणुकीसाठी मला शुभेच्छा दिल्या. आपल्या देशाची ही खासियत आहे की, आपण विविध धर्माचे लोक एकात्मतेने सुखाने नांदतो. धार्मिक एकोपा जपण्यासाठी संविधान टिकले पाहिजे आणि आणि आमचा लढा संविधान रक्षणासाठी आहे असे प्रतिपादन अमोल कीर्तिकर यांनी केले.