मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार(दि,9 मार्च) रोजी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा शाखांमधील भेटींमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहिर केली होती. आता या मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचाराच्या तयारी साठी जोमाने तयारीला लागल्याचे चित्र आहे.
या मतदार संघातील जोगेश्वरी पूर्व,गोरेगाव आणि दिंडोशी येथील शिवसेना शाखा शाखांमधून कीर्तिकर यांच्या बैठका संपन्न झाल्या. स्वतः अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विभाग क्र.3 मधील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखा क्र. 36,37 व शाखा क्रमांक 38 व 39 मधील सर्व पुरुष व महिला उपशाखाप्रमुख गटप्रमुख तसेच युवा व युवती सेनेची बैठक दिंडोशीत आयोजित केली होती.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समन्वयक आमदार विलास पोतनीस व शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विधानसभासंघटक प्रशांत कदम, माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे,विधानसभा संघटक रिना सुर्वे, पूजा चौहान,उपविभागप्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, रुचिता आरोसकर, वृंदा पालेकर, विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभाग समन्वयक कृष्णकांत सुर्वे, सोपान राजूरकर, गीतांजली घाडी, गीतांजली गायकवाड, शाखाप्रमुख अशोक राणे, मनोहर राणे, विजय गावडे, रमेश कळंबे, महिला शाखा संघटक रूपाली शिंदे,विद्या खानविलकर,योगिता धुरी व सर्व शिवसेना पदाधिकारी उपशाखाप्रमुख गटप्रमुख युवासेना युवती सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.