मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या शनिवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा शाखांमधील भेटींमधून जाहिर केलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांची प्राथमिक बैठकींना सुरुवात झालेली आहे. काल रात्री एक प्राथमिक बैठक शिवसेना नेते व आमदार अँड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडल्याचे कळते.
अंधेरी पश्चिम येथे पार पडलेल्या बैठकीत पक्षाचे निरीक्षक म्हणून नियुक्त झालेले विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस हे देखील उपस्थित होते. या बैठकीस स्वतः अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभेतील विधानसभा संघटक महिला/ पुरुष, समन्वयक महिला/ पुरुष, उपविभागप्रमुख महिला/ पुरुष, शाखाप्रमुख महिला / पुरुष, तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.