Amol Mitkari: आजपासून भाजपला उतरती कळा लागेल, अमोल मिटकरींनी वर्तवलं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:30 PM2022-06-10T15:30:11+5:302022-06-10T15:30:54+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आणि राज्यसभा निवडणुकीचा निकाल यावरुन भाजपवर निशाणा साधला.

Amol Mitkari: BJP will have a downturn from today, amol Mitkari predicted about politics of bjp | Amol Mitkari: आजपासून भाजपला उतरती कळा लागेल, अमोल मिटकरींनी वर्तवलं भाकीत

Amol Mitkari: आजपासून भाजपला उतरती कळा लागेल, अमोल मिटकरींनी वर्तवलं भाकीत

Next

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हणूनच, एकेका मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजुंचे आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अखेर २४ वर्षांनंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील नेते भाजपवर टिका करत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर टिका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आणि राज्यसभा निवडणुकीचा निकाल यावरुन भाजपवर निशाणा साधला. आज होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक की डॉक्टर बोंडे, यापैकी कोणाला फटका बसणार हे आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेमध्ये निवडून येतील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापना दिवसाच्या माध्यमातून आजपासूनच भाजपाला उतरती कळा लागेल, अशी बोचरी टिका अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यामुळे, आता निकालानंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल. 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या राज्यसभा विजयाचे मोठे गिफ्ट मिळेल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. 

महाविकास आघाडीत एकमत

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून निरनिराळे दावे केले जात आहेत. विशेषत: सहाव्या जागेवर नेमका कोणता उमेदवार निवडून येणार? याची देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, शरद पवारांवर मुख्यमंत्री नाराज नसून, महाविकास आघाडीमध्ये एकमत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 
 

Web Title: Amol Mitkari: BJP will have a downturn from today, amol Mitkari predicted about politics of bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.