Amol Mitkari: 'माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:17 AM2022-03-24T10:17:19+5:302022-03-24T10:33:25+5:30

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासंदर्भात भाष्य करताना आमदार अमोल मिटकरींनी गुजरात फाईल्सचा उल्लेख केला.

Amol Mitkari: 'If I had financial situation, I would have removed Gujarat files' | Amol Mitkari: 'माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता'

Amol Mitkari: 'माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता'

Next

मुंबई - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये चांगलीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवीन नवीन विक्रम करत असतानाच दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्यास आपण तयार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर, या ट्विटची फारच चर्चा झाली. आता, अमोल मिटकरींनी गुजरात फाईल्स बनविण्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. 

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासंदर्भात भाष्य करताना आमदार अमोल मिटकरींनी गुजरात फाईल्सचा उल्लेख केला. या चित्रपटावरुन आता नाशिकच्या घटनेचं उदाहरण घ्या, तिथं भगवं परिधान करुन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, म्हणजे तुम्हाला दहशत माजवायची आहे का?. काश्मीर फाईल्सपेक्षा गुजरात फाईल्स फार भयंकर आहे. मुजफ्फरनगरची दंगल असो, गोध्रा हत्याकांड असेल, सोहराबुद्दीन प्रकरण असेल, यांवरही चित्रपट निघायला हवा, माझी वारंवार मागणी आहे. माझी आर्थिक परिस्थिती असती, तर गुजरात फाईल्स चित्रपट मीच हाती घेतला असता, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. द काश्मीर फाईल्स चित्रपटातून घेण्यासारखं काहीच नाही, असेही त्यांनी म्हटले.  

नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी या चित्रपटावर भाष्य केलं. त्यानंतर, भाजपच्या आमदारांनी हा चित्रपट मोफत दाखवायला सुरुवात केलीय. पण, तरीही लोकं हा चित्रपट पाहायला जात नाहीत. अतिशय बोरींग हा चित्रपट आहे. देवेंद्र फडणवीस हेही डंके की चोटपर असं म्हणत आहेत. पण, काय संबंध आला महाराष्ट्रात या चित्रपटाचा, असेही मिटकरी यांनी म्हटले.

यापूर्वीही केलं होतं भाष्य

'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट म्हणजे हिंदुंचा प्रपोगांडा रेटण्यासाठी आणि मुस्लीम द्वेष पसरवणारा असल्याची टीका मिटकरी यांनी केली. तसेच त्यांनी गुजरात फाइल्स चित्रपट बनवला पाहिजे, असेही म्हटले. भारतीय जनता पार्टी कश्मीर फाइल्सच्या नावाखाली राजकारण करत असून ते साफ चुकीचे आहे. कश्मीर फाइल्स हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. तो का सुपर हिट होत आहे, तर मोहन भागवत बोलले, नरेंद्र मोदीजी बोलले म्हणून कश्मीर फाइल्स हिट होत आहे. बाकी त्या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी, असे काही नसल्याचे मिटकरी म्हणाले. 
 

Web Title: Amol Mitkari: 'If I had financial situation, I would have removed Gujarat files'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.