Amol Mitkari: सरसंघचालकांना कोरोना, अमोल मिटकरी म्हणाले आता भिडे गुरूजींना विचारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:23 PM2021-04-10T12:23:48+5:302021-04-10T12:25:53+5:30
अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंना (Sambhaji Bhide) जोरदार टोला लगावला आहे.
Amol Mitkari: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंना (Sambhaji Bhide) जोरदार टोला लगावला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोना झाल्याची बातमी ट्विट करताना अमोल मिटकरी यांनी आता भिडे गुरूजींची यावर प्रतिक्रिया घ्यावी, असा खोचक टोला हाणला आहे. कोरोना संदर्भात संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
कृपया पत्रकार बांधवानी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!!@TV9Marathi@abpmajhatv@saamTVnewspic.twitter.com/3MTQjZfL4h
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 10, 2021
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
कोरोना हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. इतकंच नाही तर "कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य माणसं संपूर्ण देशात अस्वस्थ आहेत. कोरोना हा रोगच नाहीय. हा मानसिक आजार आहे", असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं.