अमोल यादवच्या विमान निर्मितीचे अखेर ‘टेक आॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:33 AM2017-11-21T05:33:23+5:302017-11-21T05:34:24+5:30

मुंबई : देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे मुंबईचे अमोल यादव यांच्या टीएसी ००३ या विमानाची अखेर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नोंदणी केली असून तसे प्रमाणपत्रही दिले. त्यामुळे यादव यांचे विमान निर्मितीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Amol Yadav's 'Aap Take' | अमोल यादवच्या विमान निर्मितीचे अखेर ‘टेक आॅफ’

अमोल यादवच्या विमान निर्मितीचे अखेर ‘टेक आॅफ’

googlenewsNext

मुंबई : देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे मुंबईचे अमोल यादव यांच्या टीएसी ००३ या विमानाची अखेर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नोंदणी केली असून तसे प्रमाणपत्रही दिले. त्यामुळे यादव यांचे विमान निर्मितीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या नोंदणीसाठी कसोशीने पाठपुरावा केल्याबद्दल यादव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाबासकी देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वैमानिक अमोल यादव यांनी चारकोप येथील घराच्या गच्चीवर २०११ मध्ये विमान बनविले. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहात ते प्रदर्शित केले. यादव हे थ्रस्ट इंडिया या त्यांच्या कंपनीमार्फत महाराष्ट्रात विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभारतील. भारतीय बनावटीचे विमान बनविण्याचा त्यांचा संकल्प पाहता राज्य सरकारने त्यांच्या कंपनीस सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १९ आसनी विमान बनविण्यासाठी जमीन देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले आहे.

Web Title: Amol Yadav's 'Aap Take'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.