Join us

सिडकोमधील सुरक्षारक्षकांना मिळाली थकीत रक्कम

By admin | Published: July 04, 2014 3:18 AM

सिडको कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षकांना वेतनासह महागाई भत्त्यातील फरकाची रक्कम मिळाली आहे

नवी मुंबई : सिडको कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षकांना वेतनासह महागाई भत्त्यातील फरकाची रक्कम मिळाली आहे. सुरक्षा रक्षक मंडळातील ३६७ सुरक्षा रक्षक व पर्यवक्षक सिडकोच्या सेवेत आहेत. हे कामगार राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सदस्य आहेत. कामगारांना २०११ मध्ये वेतन वाढ झाली. यानंतर प्रत्येक सहा महिन्याने महागाई भत्त्यात वाढ होत गेली. परंतु २०११ पासून वेतन व महागाई भत्त्यामधील फरकाची रक्कम कामगारांना मिळाली नव्हती. संघटनेचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, विठ्ठल गोळे, विठ्ठल शिर्के यांनी याविषयी सुरक्ष रक्षक मंडळ व सिडको आस्थापनाशी चर्चा केल्यानंतर कामगारांना २ कोटी ९३ लाख रूपयांची थकीत रक्कम देण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक प्रतिनिधी संजय मोरे, दिलीप माने, लक्ष्मण नायकवाडी, राजेंद्र लोखंडे, रामचंद्र सपकाळ, अशोक खरटमोल, गणेश चव्हाण, कृष्ण विश्राम हरीयाण यांनी बोर्ड, सिडकोसह संघटनेचे आभार मानले आहेत.(प्रतिनिधी)