- जमीर काझी मुंबई : सत्ताधारी आणि विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या विकासाच्या आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या मोठमोठ्या वल्गना केल्या जातात. प्रत्यक्षात त्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावरून दिसून येते. कोकण विभाग वगळता राज्यातील इतर सर्व विभागांत आत्महत्येचे लोण पसरले असून, अमरावती विभागातील आत्महत्येचे प्रमाण मन सुन्न करणारे आहे. गेल्या सव्वातीन वर्षांत अमरावती विभागांतर्गत येणाºया पाच जिल्ह्यांतील ३,४३३ शेतकºयांनी आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतल्याची आकडेवारी आहे. त्यापैकी १,३१९ जणांच्या वारसदारांना मदतीसाठी पात्र ठरविले आहे. अमरावतीच्या खालोखाल औरंगाबाद विभागातील परिस्थिती विदारक असून, या ठिकाणी ३,१८९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असल्याचे शासनाच्या दप्तरी नमूद आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत या दोन्ही विभागांत अनुक्रमे २२७ व १९८ शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले आयुष्य संपविले आहे. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे गेल्या १८ वर्षांतील शेतकºय्ोांच्या आत्महत्येची आकडेवारी असली, तरी जिल्हावार किती आत्महत्या झाल्या? याची केवळ सव्वातीन वर्षांचीच माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार, २०१६ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत मुंबई शहर व उपनगर वगळता सहा विभागांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये एकूण ९,३६८ आत्महत्या झालेल्या आहेत. त्यापैकी ४,९२८ प्रकरणे संबंधित जिल्हा समितीकडून आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविण्यात आलेली आहेत.पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सव्वातीन वर्षांत ३०० जणांनी आपल्या आयुष्याचा अंत करून घेतला आहे. नाशिक व नागपूर विभागात अनुक्रमे १,५०० व ९३९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी अनुक्रमे ७२७ व ४८५ प्रकरणांत वारसदारांना मदत केली जाणार आहे.>अमरावती, बुलडाणा बनताहेत ‘सुसाइड हब’परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’सारखे मेगा इव्हेंट घेतले जात असतानाच, अमरावती व औरंगाबाद विभागातील शेतकरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कर्जबाजारीपणामुळे पिचला गेलेल्या बळीराजाचे प्रमाण या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. सव्वातीन वर्षांत राज्यात सर्वाधिक १,०७१ आत्महत्या एकट्या अमरावतीत जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत. त्यानंतर, बुलडाणा ९२१, यवतमाळ ८४९, अकोला ४९० या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे या जिल्ह्यांची ओळख दुर्दैवाने ‘सुसाइड हब’सारखी बनत चालली आहे.>विभागवार आत्महत्या व मदतीसाठी पात्र प्रकरणेवर्ष कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर२०१६ - ७५/३२ ४८५/२६० १०५३/७५७ १०९३/४९८ ३७४/२२१२०१७ ५/३ १०२/४७ ४७५/२५९ ९९१/७१० १०६४/४८० २८०/१३९२०१८ २/१ ९४/२८ ४२१/१७६ ९४७/६०३ १०४९/३९८ २४८/१२४मार्च१९ - २९/४ ११९/३२ १९८/१३ २२२७/२३ ३१/१एकूण ७/४ ३००/११ १५००/७२७ ३१८९/२२०२ ३४३३/१३१९ ९३९/४८५
अमरावती, औरंगाबाद विभाग ठरतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे केंद्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 4:41 AM