BREAKING: राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, २९ एप्रिललाच होणार सुनावणी; तोवर मुक्काम तुरुंगातच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:09 PM2022-04-26T12:09:39+5:302022-04-26T12:10:15+5:30

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे.

amravati mp navneet kaur rana and ravi rana no relief from court | BREAKING: राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, २९ एप्रिललाच होणार सुनावणी; तोवर मुक्काम तुरुंगातच!

BREAKING: राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, २९ एप्रिललाच होणार सुनावणी; तोवर मुक्काम तुरुंगातच!

Next

मुंबई- 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोघांनाही आता २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. राणा दाम्पत्यानं जामीनाच्या प्रयत्नांसाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या याचिकेवर २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असं सत्र न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे आता २९ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या सुनावणीवेळीच जामिनाच्या प्रश्नावर सुनावणी होईल हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला आता २९ एप्रिलपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे.

मुंबई पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात कलम ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला. याची नोंद वेगळ्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.

Web Title: amravati mp navneet kaur rana and ravi rana no relief from court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.