अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 05:36 PM2023-03-27T17:36:28+5:302023-03-27T17:38:43+5:30

अनिक्षा जयसिंघानीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Amrita Fadnavis threat case Accused Aniksha Jaisinghani granted bail | अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

googlenewsNext

महाराष्ट्रासह गोवा, आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करण्यासह विविध गुन्हे दाखल असलेला कुख्यात फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.  आरोपी अनिक्षा जयसिंघानीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

CM Eknath Shinde Live: “सावरकरांच्या अपमानाबाबत हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मविआमधून बाहेर पडावे”: CM एकनाथ शिंदे

आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला मुंबई सत्रन्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तपासात सहकार्य करण्याच्या अटीशर्तीही कोर्टाने बजावल्या आहेत.  

कोण आहे अनिक्षा?

अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिक्षावर महाराष्ट्र, गोवा आणि आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. अनिक्षा ही कायद्याची पदवीधर आहे. ती उल्हासनगरची रहिवासी असून, स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा बऱ्याच दिवसांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे.

काय प्रकरण आहे?

2021 मध्ये अनिक्षाला भेटल्याचे अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे. अनिक्षाने अमृता यांना सांगितले होते की तिला आई नाही. तिने स्वतःची डिझायनर म्हणून ओळख करुन दिली होती. तिने अमृता यांना सार्वजनिक कार्यक्रमात आपले कपडे आणि दागिने घालायला सांगितले. अमृता यांनी अनिक्षाला होकार दिला.

अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी आपल्याला धमकावून आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसीच्या कलम 120-बी (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता यांनी मलबार हिल स्टेशनवर 20 फेब्रुवारी रोजी हा एफआयआर दाखल केला होता.

Web Title: Amrita Fadnavis threat case Accused Aniksha Jaisinghani granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.