मुंबई : प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचे २५ आॅगस्टपासून मुंबईमध्ये सामने खेळविले जाणार आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी होत असलेल्या यजमान यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स सामन्याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस राष्ट्रगीत गाणार आहेत.गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईतील वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये कबड्डी सामने सुरू होत असून यावेळी अमृता फडणवीस यांना राष्ट्रगीत गाण्याचा मान देण्यात आला आहे.अमृता फडणवीस या क्रीडाप्रेमी असून मुंबईत होत असलेल्या आगामी महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या त्या आश्रयदाता आहेत. तसेच, यंदा पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या डेव्हिस कप स्पर्धेसाठीही अमृता फडणवीस मुख्य आश्रयदाता होत्या. शालेय जीवनामध्ये टेनिसपटू असलेल्या अमृता यांनी १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वही केले आहे.
अमृता फडणवीस गाणार राष्ट्रगीत, मुंबईतील प्रो-कबड्डी सामन्यांसाठी मिळाला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 5:02 AM