अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यास मदत करा

By महेश गलांडे | Published: November 19, 2020 02:54 PM2020-11-19T14:54:20+5:302020-11-19T14:56:13+5:30

अमृता फडणवीस यांनी ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन सर्वांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त ट्विट केलंय. जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा होत आहे.

Amrita Fadnavis's Sanjay Raut Tola, help keep Maharashtra clean | अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यास मदत करा

अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यास मदत करा

Next
ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन सर्वांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त ट्विट केलंय. जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा होत आहे.

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेना नेत्यावर निशाणा साधला आहे. अमृता या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह असतात, आपल्या सामाजिक उपक्रमांबद्दलही त्या नेहमीच फोटो शेअर करुन माहिती देतात. तसेच, कुटुंबातील आनंदाचे क्षणही चाहत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी शेअर करतात. तर, राजकीय ट्विट करुन अनेक राजकीय पक्षांवर विशेषत: शिवसेनेवर टीकाही करतात. आता, पुन्हा एकदा त्यांनी असंच ट्विट केलंय.  

अमृता फडणवीस यांनी ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन सर्वांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त ट्विट केलंय. जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट करताना अप्रत्यक्षपणे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. आपल्या ट्विटमध्ये अमृता यांनी Naughty हा शब्द वापरला असून त्यावर जाणीवपूर्वक फोकस केला आहे. खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणौतबद्दलच्या वादावर बोलताना कंगनाला Naughty गर्ल म्हटले होते. त्यावरुन, चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. आता, अमृता फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त खोचक टोला लगावला आहे. 

''सर्वच देशभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य महिला म्हणून विनंती करते की, आपण सर्वांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही नॉटी पुरुषांच्या आचार-विचारांची घाण फ्लश करुन महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यात मदत करावी,'' असे ट्विट अमृता यांनी केलं आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये कुणाचाही नामोल्लेख केला नाही, पण त्यांच्या बोलण्याच्या रोख दिसून येतो. दरम्यान, यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका केली होती. त्यानंतर, शिवसेनेच्या महिला नेत्यांनी अमृता यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. 

गाण्याचं कौतुक करणाऱ्यांचं मानलं आभार  

अमृता फडणवीस यांनी भाऊबीज दिवशी त्यांच्या मधूर आवाजातील गाणं इंटरनेटवरुन रिलीज केलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणं त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केलं. नारीशक्तीच्या सन्मानार्थ या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे, इंटरनेटवर हे गाणं चागलंच व्हायरल झाला. तर, काहींनी टीकाही केली, त्याबद्दल अमृता फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. ''तिला जगू द्या... या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज तिला मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल,'' असेही अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय. 
 

Web Title: Amrita Fadnavis's Sanjay Raut Tola, help keep Maharashtra clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.