Amruta Fadanvis: अमृता फडणवीस 2 दिवसांत माफी मागा, अन्यथा; दिपाली सय्यद यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 04:29 PM2022-06-12T16:29:13+5:302022-06-12T16:32:13+5:30
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या आपल्या बेधडक शैलीमुळेही सर्वपरिचीत आहेत. एखाद्यावर टिका करताना, किंवा एखाद्या विषयावर भाष्य करताना त्यांच्यातील हा धाडसीपणा दिसून येतो. आता, वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन (prostitute profession) म्हणून स्वीकार करायला हवा. जर्मनीमध्ये तर त्याकडे आदराने बघितले जाते. मी त्याच्या पाठिशी आहे, असे विधान अमृता फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis wife and singer Amrita Fadnavis) यांनी केले आहे. अमृता यांच्या या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी अमृता यांना थेट इशाराच दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी बोलताना, समाजात वेश्याव्यवसायामुळे संतुलन राखले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच, वेश्या व्यवसाय हा पुरातन काळापासून सुरु असून त्याद्वारे समाजाचे संतुलन राखण्याचे काम करताना तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तुम्ही जे काम करत आहात ते प्रामाणिकपणे करत आहात. अमृता फडणवीसांच्या या विधानावरुन दिपाली सय्यद यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.
''अमृता फडणवीस आपण समाज्यात महिलांची प्रतिमा कशी तयार करताय? दोन दिवसात माफी मागा अन्यथा महिला आयोगाच्या माझ्या तक्रारीला सामोरे जा!'', असा इशाराच दिपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे.
अमृता फडणवीस आपण समाज्यात महिलांची प्रतिमा कशी तयार करताय? दोन दिवसात माफी मागा अन्यथा महिला आयोगाच्या माझ्या तक्रारीला सामोरे जा! @ShivSena@fadnavis_amruta@BJPMahilaMorcha@Dev_Fadnavis
— Deepali Sayed (@deepalisayed) June 11, 2022
आम्ही तुमच्यासोबत
गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील गर्वाचं काम करत आहात, अशा शब्दांत त्यांना पाठिंबा वेश्याव्यवसायाला पाठिंबा दर्शविला आहे. तुमच्या या व्यवसायाला सर्वोच्च न्यायालयानेही पाठिंबा दर्शविला आहे. तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा, असा विश्वासही अमृता यांनी बोलून दाखवला.