Join us

Amruta Fadanvis: अमृता फडणवीसांना 'इंडियन ऑफ द वर्ल्ड' पुरस्कार, ब्रिटन संसदेत सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 3:51 PM

मुख्यमंत्री न केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या आल्या.

मुंबई - राज्यात सुमारे १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर गुरूवारी भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. या राजकीय सत्तांतराच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या लंडन दौऱ्यावर आहेत. नुकतेच, लंडनमध्ये त्यांचा 'इंडिया ऑफ द वर्ल्ड' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री न केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पण, भाजपाचे वरच्या फळीत नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांचा त्याग आणि समर्पण म्हटले. तर, अमृता फडणवीस यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले. त्यानंतर, आज पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवरुनच लंडन दौऱ्याची माहिती दिली. तसेच, 'इंडिया ऑफ द वर्ल्ड' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचेही सांगितले. 

ब्रिटनच्या संसदेत ‘इंडो-यूके संबंध’ या विषयावर बोलणे आणि ब्रिटनच्या संसदेत ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार प्राप्त करणे, हा सन्मान होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने भारत-यूके संबंध मजबूत झाले आहेत. तसेच, हेच संबंध विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरही विस्तारत आहेत, असेही अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले. 

देवेंद्र फडणवीसांचे केले अभिनंदन

देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विट विशेष महत्त्वाचे ठरले. अमृता फडणवीस आपल्या ट्विटमधून भावनांना वाट करून देताना दिसतात. पण, हे ट्वीट अतिशय सरळ-साधे व अत्यंत औपचारिक असल्याप्रमाणे दिसून आले. 'आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा', असे ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले. 

टॅग्स :अमृता फडणवीसलंडनमुंबईदेवेंद्र फडणवीस